शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही..: राजू शेट्टी -सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:37 IST

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी, तपास सीबीआयकडे द्यावा‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत.

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलातील वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी, असे आवाहनही खा. शेट्टी यांनी केले.

अनिकेत कोथळे खून प्रकरणात पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, हा तपास सीबीआयकडे द्यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी खा. शेट्टी बोलत होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. खा. शेट्टी, माकपचे नेते अजित अभ्यंकर व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी समशेरखान पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.

खा. शेट्टी म्हणाले की, अनिकेतच्या खुनामुळे पोलिसांचा समाजातील आदरभाव संपला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. ते आज सांगली जिल्ह्यात असल्याने मोर्चा काढला आहे. मोर्चाद्वारे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. ती पोलिसांनी दाबून टाकली आहेत. विश्वनाथ घनवट, युवराज कामटेसारखे अनेक पोलिस अधिकारी आजही मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. इस्लामपूरमधील डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाचा तपासही गुंडाळून टाकला. मी गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहे; पण कधीही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. पण सामान्यांवर अन्याय होत असेल तर, कधीच गप्प बसत नाही.

ते म्हणाले की, पोलिस दलातील भ्रष्ट अधिकाºयांना बाजूला केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी साफसफाई करावी. खरे तर या सर्वपक्षीय मोर्चात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झाडून सहभागी व्हायला पाहिजे होते. पण ते आले नाहीत. कारण पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी ते ‘सुपारी’ घेतात. त्यांचे हातही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. दर तीन वर्षांनी हे लोकप्रतिनिधी मर्जीतील जिल्हा व पोलिस ठाणे देण्यासाठी अधिकाºयांकडून खंडण्या घेतात.

या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त करायला हवा. जोपर्यंत अनिकेतच्या कुटुंबास न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही.या मोर्चात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, कॉ. उमेश देशमुख, अमर पडळकर, आश्रफ वांकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, महेश पाटील, आनंद देसाई, आशिष कोरी, सतीश साखळकर, रेखा पाटील आदी सहभागी झाले होते.आंदोलकांनी आणलेले ‘आज अनिकेत उद्या कोण?’, ‘आई हे पप्पांना मारून आलेत का?’, ‘हा लढा सर्वांसाठी’ असे फलक लक्षवेधी ठरत होते.सीआयडीवर विश्वास नाही : पठाणसेवानिवृत्त पोलिस अधिकारी समशेरखान पठाण म्हणाले की, अनिकेत कोथळे प्रकरणात सांगलीकरांनी लढा दिल्याने पोलिसप्रमुख व उपअधीक्षकांची बदली झाली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने वरिष्ठ पोलिस अधिकाºयांशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. कामटेचे ‘कॉल डिटेल्स’ काढून या अधिकाºयांचा शोध घ्यावा. त्यांनाही सीआयडीने आरोपी करावे. सीआयडी विभागातील अधिकारी पोलिस दलातीलच असतात. शिक्षा म्हणून त्यांची सीआयडीत बदली केली जाते. त्यामुळे सीआयडीच्या तपासावर विश्वास नाही. हा तपास सीबीआयकडे द्यावा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.शेट्टींच्या कडेवर प्रांजलअनिकेत कोथळेचे संपूर्ण कुटुंबही मोर्चात सहभागी झाले होते. अनिकेतची पत्नी संध्या हिच्याबरोबर तिची तीन वर्षाची मुलगी प्रांजल होती. खा. शेट्टी यांनी प्रांजलला स्वत:च्या कडेवर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईपर्यंत प्रांजल शेट्टी यांच्या कडेवर होती.सुपारी घेऊन खून : अभ्यंकरमाकपचे नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, अनिकेत कोथळे प्रकरणामुळे गुंडाराज व पोलिसराज यामधील फरक आता मिटला आहे. दोन हजाराच्या चोरीसाठी अनिकेतचा जीव घेतला. त्याचा मृतदेह जाळला. यावरुन पोलिसांमध्ये किती गुंडाराज आहे, याची प्रचिती येते. पोलिस गुंड व दरोडेखोर झाले आहेत. ‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांनी कामटेला मदत केली असेल तर, त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे. कोथळे कुटुंबास न्याय देण्यासाठी प्रसंगी राज्यभरात लढा उभा केला जाईल.